विजेच्या धक्क्याने एकाच घरातील तिघांचा जागेवरच मृत्यू.
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : विजय लकडे
दौंड तालुक्यातील दापोडी गावात घरगुती विजेचा धक्का बसून एकाच घरातील आई-वडिलांनी मुलगा या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा अपघात हिटरमुळे झाल्याचा गैरसमज पसरला होता. वास्तविक महावितरणच्या घराब वायरमुळे घरातील पत्र्याला वीजप्रवाह उतरल्यामुळे हा अपघात झाला आहे.
सोमवारी सकाळी सातच्या सुमारास दौंड तालुक्यातील दापोडी येथे ही घटना घडली. दापोडी गावातील अडसूळ यांच्या घरामध्ये भाडेतत्त्वावर राहणारे सुरेंद्र देविदास भालेकर वय (४५) अधिका सुरेंद्र भालेकर वय (३८) व प्रसाद सुरेंद्र भालेकर वय (१९) या एकाच घरातील तिघांना घरातील विजेचा धक्का बसून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांची एक मुलगी काही कारणास्तव घराबाहेर गेल्यामुळे ती यातून सुखरूप वाचली. भालेराव कुटुंब हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून उदरनिर्वाहासाठी दौंड तालुक्यातील दापोडी येथे वास्तव्यास आले होते. संबंधित घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.
भालेराव कुटुंब हे दापोडी गावातील सर्वांशी सौहार्दपूर्ण वागल्यामुळे दापोडी गावातील लोकांनाही या घटनेचा धक्का बसला आहे यामुळे संपूर्ण दापोडी गावावरती शोककळा पसरली आहे.