जावली l धनंजय गोरे l बोंडारवाडी धरणाचा प्रश्न पेटणार : दि. १८ ऑगस्टला केळघर येथे ५४ गावातील शेतकरी एकवटणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-----
जावली : धनंजय गोरे
बोंडारवाडी धरण क्षेत्रातील लाभार्थींनी दि . १८ ऑगष्ट रोजी होणाऱ्या मेळाव्याला आपआपले ७ /१२ घेऊन मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक मुक्ती दल अध्यक्ष व बोडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख मार्गदर्शक  डॉ . भारत पाटणकर यांनी केले .   
         केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकित ते बोलत होते . यावेळी आदिनाथ ओंबळे ,नारायण धनावडे ,श्रमिक मुक्ती दलाचे राज्य समनव्यक संतोष गोटल, नारायण सुर्वे , एकनाथ सपकाळ , राजेंद्र जाधव , जगन्नाथ जाधव , विलास शिर्के , सुरेश कासुर्डे , शिवाजी बेलोशे , उषा उंबरकर  बाजीराव  धनावडे ,श्रीरंग बैलकर , अशोक पार्टे,बजरंग चौधरी  यांसह ५४ गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संखे ने उपस्थीत होते .
      डॉ पाटणकर पुढे म्हणाले बोंडारवाडी धरण होणार हे १०० % खरे आहे . परंतू आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्या पुर्वी या प्रकल्पाच्या शुभारंभाचा नारळ फूटून त्याला गती मिळाली पाहिजे तसेच या प्रकल्पात बाधित गावांना व शेतकऱ्यांना प्राधान्याने योग्य मोबदला व पुनर्वसन लाभ मिळावा यासाठी मी व कृती समिती सरकार दरबारी आधी पुर्नवसन मग धरण या मार्गणी साठी आग्रह करणार आहे . ५४गावांतील धरणाच्या पाण्याने किती क्षेत्र भिजनार आहे. त्यानुसार गावांतील कुटुंब संख्या यांचा अभ्यास करून पाणी वापर सोसायटीची स्थापना करण्यात येऊन एकही कुटुंब पाण्यापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी धरण लाभ गाव समितीने घ्यावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला.  
      भविष्यात निर्माण घेणारे धोके टाळण्यासाठी ५४ गावांच्या लाभ क्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे . या साठी पुढील धोरण ठरवण्यासाठी सर्वानुमते दि . १८ ऑगष्ट रोजी भव्य मेळावा घेण्यात येणार असून मुंबई , पुणे व अन्यत्र विस्थापित शेतकऱ्यांनी आप आपले ७ /१२ , खाते उतारे घेवून टाळाटाळ न करता या बैठकीला स्वतः जातीने हजर रहावे असे आवाहन करण्यात आले .
To Top