पुरंदर ! २७ वर्षाच्या निकिताने गळफास घेतला : संतप्त नातेवाईकांनी केले सासरच्या दारातच अंत्यसंस्कार : जेजुरी पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निरा ता. येथील २७ वर्षीय विवाहिता निकीता चैतन्य घुले हिने दि. ११ रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सासू-सासरे,नवरा व दोन नणंद यांना निकीताच्या मृत्यूस जबाबदार धरत सासरच्या दारातच निकीताचे अंत्यसंस्कार करण्यात आले. 
        याबाबत वाघळवाडी ता. बारामती येथील निकीताचे चुलते जालिंदर बबन सावंत वय ५० यांनी जेजुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून निरा ता. पुरंदर येथील सासरा किशोर विठ्ठल घुले, सासू सुवर्णा किशोर घुले, नवरा चैतन्य किशोर घुले, नणंद पूजा किशोर घुले व आरती किशोर घुले यांच्यावर जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
       काल दि. ११ ऐवजी राहत्या घरी निकिताने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिला लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काल दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.
           माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हणटले आहे की, निकिताच्या लग्नानंतर चार ते पाच महीने झाले नंतर सासु सुवर्णा किशोर घुले, नणंद पुजा किशोर घुले व  आरती किशोर घुले हया तिला खर्चासाठी पैसे देत नसायच्या व तिस तुझे बापाचे धरुन महीना दहा हजार रुपये घेवुन ये नाहीतर तुझे तु बापाचे घरी जावुन राहा, असे वेळो वेळी म्हणाल्या मुळे मुलगी निकीता हि त्यावेळी आमचे घरी येवुन पंधरा दिवस व महीनाभर येवुन राहत होती, दरम्यान तिचे सासुचे निकीताचे आई वडील व घरच्यांना फोन यायचे व तिला तिकडेच ठेवा. ति औदसा आमचे घरी आल्यापासुन आमचे घराचे वाटोळे झाले आहे. असे म्हणुन शिवीगाळ करत व तिला जर नांदायला पाठवायचे असेल तर दर महीना दहा हजार रुपये खर्चासाठी देत जा.
२०२२ चे दिवाळीमध्ये निकिता पायी चालत आमचे घरी आली होती त्यावेळी आम्ही तिस विचारपुस करता तिने सासु व दोन नंदा हया तिस लग्नाचे पहील्या दिवाळीला तुझे आई- बापाकडुन जावई चैतन्यला एक तोळयाची सोन्याची अंगठी कराय सांग व चांगला पोशाख करायला सांग आम्ही घुले पाटील आहोत. असे म्हणाले नंतर मुलगी निकीता हिने त्यांना माझे आई-वडीलांची परस्थीती चांगली नाही. असे त्यांना सांगीतले होते त्यावर त्यांनी मुलगी निकीता हिस पती चैतन्य, सासु सुवर्णा किशोर घुले, नणंद पुजा किशोर घुले, आरती किशोर घुले यांनी तिस हाताने लाथा बुक्यानी मारहाण करुन शिवीगाळ करुन अंगठी घेवुन दिवाळीचा मानपान करायला सांग. असे वारंवार छळ करत असल्याचे फिर्यादीत म्हणटले आहे.
To Top