Pune News ! महाराष्ट्र युवक संसदेच्या खासदारपदी जिल्ह्यातून शुभम मदने व पदमश्री भुजबळ यांची निवड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
१९ ते २० नोव्हेंबर रोजी मुंबईत युवा संसद  संपन्न होणार आहे. त्यासाठी ३६ जिल्ह्यातुन ७२ संसद प्रतिनिधी येणार आहेत. 
        यामध्ये पुणे जिल्ह्यातून पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील पदमश्री मनोज भुजबळ व बारामतीमधील गडदरवाडी येथील शुभम मदने यांची निवड करण्यात आली असुन ते पुणे जिल्ह्याचे नेतृत्व 
करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत देशातील युवक युवतींना आपल्या देशातील संसदतेचे कामकाज कशा प्रकारे चालवले जाते याची माहिती व्हावी तसेच भविष्यातील युवकांचे लोकशाहीतील योगदान कसे महत्वाचे आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जाणार आहे. या कार्यक्रमानंतर 
विधीमंडळ, राजभवन, विधानसभा, राज्यसभा, मंत्रालयाच्या भेटी सुद्धा या माध्यमातुन घेतल्या जाणार आहेत. 
पदमश्रीच्या निवडीचे श्रेय तिने आपली आई मंजुषा भुजबळ व वडील मनोज भुजबळ यांचे असल्याचे सांगितले. दरम्यान शुभम मदने पदमश्री भुजबळ हिची 
महाराष्ट्र युवक संसदेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे
...
To Top