पुरंदर ! निरेच्या महिलेची बारामती तालुक्यातील खामगळवाडी येथे आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा ता पुरंदर येथील जयश्री जगदीश घुले या महिलेने बारामती तालुक्यातील खामगळवाडी येथील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
          याबाबत दत्तात्रय दिलीप निंबाळकर वय-३६ वर्षे, व्यवसाय व्यापार रा. निरा ता. पुरंदर जि. पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी लिहून दिलेल्या तक्रारीत म्हणटले आहे की, मी नीरा ता पुरंदर ठिकाणी माझी कुटूंबासह यास असून मी फळ विकीचा व्यवसाय करून त्यावर उपजिविका करतो माझे घराचे शेजारी जगदिश प्रकाश घुले हे त्याची पत्नी जयश्री जगदिश घुले वय ४५ वर्षे व दोन मुलासह राहण्यास असून जयश्री घुले या प्राथमीक आरोग्य केंद्र पणदरे अंतर्गत येणारे ढाकाळे उपकेंद्र येथे आरोग्य सेविका म्हणुन नोकरी करतात. त्या मानसीक आजाराने जस्त असल्याने त्याचेवर के. ई. एम. हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु होते.
        दि २ रोजी रोजी जयश्री जगदिश घुले या ढाकाळे येथून आरोग्य केंद्रातून कामावरून दुपारी २:३० वा चे सुमारास सुटल्यानंतर त्या त्यांचे घरी न आल्याने मी तसेच जगदिश प्रकाश घुले असे आम्ही वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे त्या हरवले बाबत तकार देण्यासाठी आलो होतो. जगदीश घुले यांनी त्यांची पत्नी जयश्री या हरवले बाबत तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांचे मोबाईलचे लोकेशन वरून शोध घेत असताना मौजे खामगळवाडी गावचे हदीत रात्री ९.४५ वा चे सुमारास खामगळवाडी ते खामगळवाडी पाटी रोडचे कडेला रूपेश बाळासो खामगळ यांचे शेतातील जुने पडीक विहीरीचे कडेला त्यांची पर्स व चप्पल दिसल्याने आम्ही विहीरीतील पाण्यात पाहीले असता सदर विहीरीत जयश्री जगदिश घुले यांचे पाण्यात दिसले. त्यानंतर आम्ही लोकांचे मदतीने त्यांचे प्रेत बाहेर काढले नंतर त्यांची काहीएक हालचाल होत नसल्याने त्या मयत झाल्याची खात्री झाल्याने खबर देण्यासाठी आलो असून सदर मयता बाबत माझी काहीएक तकार नाही.
To Top