हेल्लो..... भाऊसाहेब ऑफिसला कधी येणार आहे.....! हेल्लो... हेल्लो करून शेतकऱ्यांचा गळा सुकला....! पण भाऊसाहेब काय दिसेनात.. मुरूम सजा तलाठी कार्यालयातील तीन गावातील शेतकऱ्यांची ससेहोलपट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आजतरी भाऊसाहेब येतील आणि माझं काम होईल या आशेवरच शेतकरी रोज तलाठी कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र शेतकऱ्यांना भाऊसाहेब दिसेनासेच झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
           मुरूम गाव कामगार तलाठी हे मुरूम, वाणेवाडी व वाघळवाडी या तीन गावातील शेतकऱ्यांसाठी असून गेले अनेक दिवसांपासून तलाठी भाऊसाहेबच दिसेनात आणि दिलेच तरी कामे होत नाही. म्हणजे भाऊसाहेब असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 
              भाऊसाहेब वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहिल्यामुळे नागरिकांना शासकीय व  इतर कागदपत्राच्या कामांसाठी अडचणी निर्माण होत आहेत. गेले कित्येक दिवस लोकांना तलाठी भाऊसाहेबांच्या मनमानी कारभारला समोर जावे लागत आहे. कित्येक दिवसाचे प्रलंबित कामे ठेवली जात आहेत तसेच इतर कामकाजांना वेठीस धरले जात आहे व नाहक त्रास दिला जात आहे लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून लोकांमध्ये तलाठी भाऊसाहेब बदलीची मागणी धरली जात आहे. वानेवाडी मध्ये असणारे तलाठी कार्यालय हे मुरूम नावाने असून ते वानेवाडी मध्ये चालवले जाते पण मुरूम गावातील ग्रामस्थांकडून मुरूम मध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मागणी केली जात आहे. तलाठी भाऊसाहेब मंगळवारी आले की थेट शनिवारीच येतात. कधी येतात आणि कधी जातात हे कोणालाच दिसत नाही. फोन केला तर स्वीच ऑफ, लागला तर या बारामतीला, बर आता सहीसाठी ३० किलोमीटर बारामतीला जाणं शेतकऱ्यांना परवडणार आहे का? दाखले, सातबारे, इकरर, निराधार पेशन योजना, वारस हक्क सोड, बोजा नोंदी, मोर्गेज नोंदी, बोजा कमी दाखले, बोजे कमी करणे अशी विविध कामे प्रलंबित होत आहेत. दोन तीन महिने नोंद कामे केले जात नाही. त्यामुळे भाऊसाहेबांच्या बदलीची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
To Top