सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी (ता. बारामती) येथील प्रथमेश प्रसाद केंजळे (वय 31) या विवाहित तरुणाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
हैदराबाद येथे तो नोकरीस होता आणि तेथेच त्याला धक्का बसला. अत्यंत अल्प वयात असा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमेश्वर कारखान्याचे शेती विभागाचे निवृत्त अधिकारी प्रसाद केंजळे हे त्याचे वडील होत तर सोरटेवाडीचे माजी सरपंच विकास केंजळे हे त्याचे चुलते होत. प्रथमेश हा सोरटेवाडी माध्यमिक विद्यालयाचा अत्यंत गुणी विद्यार्थी होता. पुणे येथे त्याने फार्मासीचे शिक्षण घेत हैदराबाद येथे उत्तम नोकरी मिळविली होती. त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
पुणे येथे वैकुंठ स्मशानभूमीत उद्या (बुधवारी) त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.