सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
साताऱ्या सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातुन फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वःताची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नव्हते परंतु मुलगी झाली हो या मालिकेतील पाटील नावाच्या भुमिकेमुळे व बिग बॅासच्या शोमुळे घराघरात पोहचलो याचा आनंद आहे असे मत जेष्ठ अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील नितीन यादव यांच्या निवासस्थानी माने यांनी मंगळवार (दि.३१) रोजी सदीच्छा भेट दिली यावेळी चर्चेत किरण माने बोलत होते. चित्रपट क्षेत्रात एका ठराविक वर्गाची मक्तेदारी आहे, आपल्यासारख्या खेडे गावातून आलेल्या तरुणाला या क्षेत्रात सिद्ध करत असताना बऱ्याच अडचणी उभ्या राहिल्या, परंतु संघर्ष करीत आज या वेगळ्या उंचीवर असल्याचा आनंद असल्याचे माने म्हणाले. चित्रपटक्षेत्रात काम करत असताना सोबत सोशल मिडीयावरही लिहीत समाज प्रबोधन करण्याचे काम करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो त्यातून एक वेगळेच आत्मसमाधान लाभत असल्याचे हे म्हणाले.
लहानपणी चित्रपट सृष्टीत येईल असे वाटले नव्हते मात्र काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होतो आणि यातून कला क्षेत्राकडे वळलो असे माने म्हणाले. सुरुवातीला हलाकिच्या परिस्थितीत दिवा काढून ग्रामीण बोलीभाषेत आपली कला सादर करत चित्रपट सृष्टीत नाव केले असल्याचे हे म्हणाले. चित्रपट, मालिका आणि नुकत्याच संपलेल्या बीग बॉस शोमुळे रसिक प्रेक्षक प्रेम करू लागले आणि प्रेक्षकांचे प्रेमच यापुढेही काम करण्यास प्रोत्साहन देईल असे माने यांनी सांगितले. बीग बॉस शोमुळे घराघरात पोहोचलो याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला या क्षेत्राकडे वळलो तेंव्हा घरचे नाराज होते आता मात्र घरचे आणि गावातील ग्रामस्थ प्रेम करतात असेही माने यांनी सांगितले. यावेळी उद्योजक दीपक साखरे, पत्रकार महेश जगताप, युवराज खोमणे, नितीन यादव ,सोमनाथ यादव उपस्थित होते.