शिरोळ ! चंद्रकांत भाट ! मोबाईल चोरांना शिरोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या : चार मोबाईल व एक मोटारसायकल जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-----
शिरोळ : प्रतिनिधी 
जबरदस्तीने  हिसडा मारून मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील  सराईत दोघा संशयीत चोरट्यांना शिरोळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल व एक मोटरसायकल असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्हेगाराकडून  गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आणखीन गुन्हे उघडीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली .
        ते म्हणाले, 28 जानेवारी रोजी फिर्यादी सुनील सुखदेव हेरवाडे रा धरणगुत्ती (ता. शिरोळ) यांनी धरणगुत्ती ते जयसिंगपूर रोडने जात असताना संशयित आरोपी सचिन उर्फ पप्प्या गौतम माने वय (३५ ) मूळ गाव इंदिरानगर सांगली सध्या  रा  बेघर वसाहत चिपरी ता . शिरोळ  व निलेश रणजीत माळी( वय वर्ष २४ रा .इंदिरानगर सांगली) हे दोघे फिर्यादी हेरवाडे याच्या हातातील मोबाईल जबरीने हिसडा मारून घेऊन धरणगुत्तीच्या दिशेने गेले. फिर्यादी हेरवाडे याने तातडीने शिरोळ पोलिसांना व धरणगुत्ती गावातील मित्रांना सदर घटनेची माहिती दिली. त्याच्या मित्रांनी व ग्रामस्थांनी या दोघा  संशयीताना धरणगुत्ती चौकात पकडले पोलिसांनी या दोघांची झडती घेतल्या असता त्यांच्याकडे चोरीचे चार मोबाईल  मिळून आले.
     दरम्यान ,शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील एकूण तीन मोबाईल चोरी केल्याचे त्या दोघांनी गुन्हा कबूल केला असून सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, बलात्कार यासह अन्य  दहापेक्षा अधिक  गंभीर गुन्हे  केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
    ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे,  गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील ,जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक, विश्वास कुरणे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, राजेंद्र धुमाळ, राजाराम पाटील ,ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी  रहिमान शेख, संजय राठोड ,राजेंद्र पुजारी, मनोज मडिवाळ यांच्या पथकाने केली.
To Top