सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : adv. गणेश आळंदीकर
"श्रद्धा कदाचित अनाठायी असेल क्वचित निष्फळ ही होईल ,पण ती असल्याशिवाय कोणतेच कार्य शक्य नाही "असे लोकमान्य टिळकानी म्हटले आहे.कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता ज्योतीष शास्त्राला अध्यात्माची जोड देत सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ( ता .खटाव )चे ज्योतीष शास्त्र व अध्यात्मशास्त्रात पी एच डी करुन डॉक्टरेट मिळवणारे डॉ.प्रविणकुमार उर्फ दिपक कदम सर आपल्या घरीच या शास्त्राचे धडे परदेशी पाहुण्याना मोफत देत आहेत.सर्वसामान्य नागरिकाबरोबर १७० रॉकेट व ६० सॅटेलाईट लॉंचींग च्या सहभागात मोलाचा वाटा असणारे ईसरो चे वैज्ञानीक डॉ.एस.व्ही शर्मा यानी स्वत: पुसेगाव च्या भवानीनगर स्थित या केंद्राला भेट देवुन कदम सरांचे कार्याचे कौतुक करुन विज्ञान आणी अध्यात्म यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे सांगीतले .
एकीकडे बुवा बाबा च्या नावाने समाजात अडचणीतील लोकाना लुटण्याचे काम करणा-या घटना वाढत असताना हिंदु संस्कृती चे संत साहीत्याचे परदेशी अभ्यासकाना मोफत ज्ञान वाटत जोतीष शास्त्राचे निस्वार्थी धडे देण्याचे काम या अध्यात्म केंद्राद्वारे गेली अनेक वर्ष बिनबोभाट चालु आहे .
या केंद्राद्वारे डॉ. दिपक कदम यानी आत्तापर्यंत फ्रांन्स ,ईटली सारख्या देशातील नागरीकाना मोफत ज्ञानाचे वाटप केले आहे .परिस्थीतीने मध्यमवर्गीय असुन सलग सात वर्ष महाविद्यालयात ईंग्रजी विषय शिकवणारे प्राध्यापक दिपक कदम यानी काही वर्षापुर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा देवुन जोतीषशास्त्र व अध्यात्म शास्त्रात पी एच डी मिळवुन वेगळ्या पद्धतीने समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला व स्वत:च्या निवासस्थानीच या शास्त्रांचे मोफत अभ्यास केंद्र स्थापन केले .
वैयक्तिक समस्यापेक्षा समाजहिताच्या समस्याना व त्यावरील उपायाना ते जास्त महत्व देतात. जर कुणी वैयक्तीक समस्या घेवुन या केंद्रात गेला तर त्याला अध्यात्मीक व जोतीष शास्त्रातील ज्ञानानुसार शास्त्रोक्त मदत केली जाते मात्र त्याच्या ईच्छेने त्याला एखाद्या सामाजिक संस्थेला मदत करा किवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याची फी भरा ,अनाथ आश्रमात अगदी विद्याथ्यांची कपडे वाटण्यापासुन त्या अनाथाना अंथरुन पांघरुन पर्यंत मदत करायचा सल्ला ते देतात
वैयक्तीक अडचनीसाठी स्वत:साठी काही न घेता व ईतर संस्थाना मदत करायला ते लावतात हे विशेष.
जगत गुरु शंकराचार्य यांचे सानीध्य लाभलेले, ,ब्रम्हलीन स्वामी स्वरुपानंद सरस्वती यानी गौरव केलेले डॉ प्रविणकुमार उर्फ दिपक कदम यानी प्रसिद्धीपासुन दुर राहत पुणे येथील एका मुक्तविद्यापीठाची तसेच काशी येथील विद्यापीठाची विद्या वाचस्पती ही डॉक्टरेट घेतली असताना, मोठ्या पगाराची नोकरी असताना निस्वार्थीपणे आपले समाज कार्य करीत आहेत याबाबत त्याना विचारले असता मानवी जीवन ताण तणावाने युक्त असुन मन:शांतीसाठी साधना गरजेची असुन दिवसभरातुन किमान २० मिनीट प्रत्येकाने साधना केली पाहीजे असे ते म्हणाले .
ईसरोद्वारे "मिशन ए मंगळ" मधे मोलाचे योगदान असणारे डॉ.एस.व्ही .शर्मा यानी पुसेगाव येथील या केंद्रावर भेट दिली असता स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेमधे होणारे रुपांतर प्रक्रिया चे प्रात्यक्षीक कदम सर यांचेकडुन समजुन घेतले व अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे सांगत जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते असे ते म्हणाले तसेच निसर्गातील मानव निर्मीत बदलामुळे ग्लोबल वार्मींग सह वैज्ञानीक दृष्टिकोनातुन होणारे नुकसान याबाबत त्यानी यावेळी माहीती दिली .
चौकट ..
ऐन दिवाळीत पुसेगाव ला परदेशी अभ्यासकांचे आगमन .
प्राचीन संस्कृती ,जोतीष शास्त्र व अध्यात्मशास्त्र याबाबत ऐच्छीक मदतीवर पुसेगाव ता खटाव जि सातारा येथे डॉ.दिपक कदम यांचे निवासस्थानी असलेल्या या केंद्रावर ईटलीतील अभ्यासकानी गर्दी केली आहे . ईटलीतुन आलेल्या अभ्यासकाना भारताची कोणती गोष्ट आवडते व का आवडते हा ईंग्रजीतुन प्रश्न विचारल्यावर अंड्रीया ,जियाकोमो ,मार्को या तिघानी भारतात खुप काही प्राचीन विद्या शिकण्यासारख्या असुन आमच्यात या ज्ञानामुळे ताकद येते असे उत्तर त्यानी सोमेश्वर रिपोर्टरशी बोलताना दिले .