सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुणे पंढरपूर महामार्गावर ती जेजुरी खिंडी येथे स्विफ्ट डिझायर व टाटा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन पाच जण गंभीर जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
जेजुरी येथून निघालेली स्विफ्ट डिझायर व नीरेकडून येणारा डिझेलने भरलेला टँकर यांची जेजुरी नजीक जेजुरी खिंडी येथे समोरासमोर धडक होऊन चारचाकी गाडीतील बारामती तालुक्यातील पणदरे नजीक म्हसोबावाडी येथील पाच युवक गंभीरित्या जखमी झाले आहेत. यातील दोघेजण अथ्यवस्थ आहेत सोमेश्वर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर पुणे येथे निघाले असता यांनी तातडीने जेजुरी देवस्थान विश्वस्त मंगेश घोणे यांच्याशी संपर्क साधून ॲम्बुलन्सची व्यवस्था करून जखमींना तातडीने मदत करून जेजुरी येथील आयसीयु हॉस्पिटल जेजुरी येथे दाखल करून उपचारासाठी मदत केली. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशन करीत आहे