सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा-शिवतक्रार येथे रॉकेट फटाकडा वाजवल्याने हवेत उंच उडून तो फटाकडा शेजारील उसात पडल्यामुळे तुटून जाणाऱ्या तीस गुंठे क्षेत्रातील उस पूर्णपणे जळून खाक झाला.
शिव तक्रारवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय शेजारी असणाऱ्या केशव लक्ष्मण बंडगर गट नंबर 39 यांच्या 265 जातीच्या तुटून जाणाऱ्या उसामध्ये रॉकेट जातीचा फटाकडा पडल्यामुळे उसाने पेट घेतला शेजारील राहणाऱ्या तरुणांनी प्रसंगावधान राखून शेजारील उसाचे क्षेत्र तोडून दुसऱ्या बाजूला काढल्यामुळे बाकीचे उसाचे क्षेत्र वाचले पॉलीकेमच्या अग्निशामक बंबाने शर्तीने प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु काही जागेवरती जाण्यास वाट नसल्यामुळे तीस गुंठे क्षेत्रातील ऊस पूर्णपणे जळाला आहे
सोमेश्वर कारखान्याचे सभासद केशव बंडगर यांनी विना विलंब उसाची तोड मिळावी अशी मागणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे केली आहे.