सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
दै.पुण्यनगरी चा दिवाळी अंक वाचकांना समृद्ध करणारा असून अंकांमध्ये ज्ञानाचा खजिना भरलेला आहे असे मत आमदार संग्राम थोपटे यांचे सुपुत्र युवानेते पृथ्वीराज थोपटे यांनी व्यक्त केले.
यंदाच्या दैनिक पुण्यनगरीच्या दिवाळी अंकाचे सोमवार दि.१३ प्रकाशन करतेवेळी युवानेते थोपटे बोलत होते.दै. पुण्यनगरी समूहाने उत्कृष्ट प्रकारचा दिवाळी अंक समाजातील नवनवीन जडणघडणीचे दर्शन घडवीत अभ्यासू लेखकांनी आपापली मते मांडली आहेत.या अंकातील विविध विषयावरील अभ्यासपूर्ण लेख विचारांची उंची वाढवतील असेही गौरवउद्गार थोपटे यांनी काढले.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे ,राजेंद्र शेटे,मोहन चव्हाण,संदीप टोळे, प्रकाश जगताप,बापू घोलप,सुदाम मोहिते,तालुका प्रतिनिधी संतोष म्हस्के,कुंदन झांजले उपस्थित होते.