सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-आंबाडे-मांढरदेवी मार्गावरील वाघजाईनगर जवळील फुलाच्या कठड्यांना अज्ञात वाहन धडकल्याने पुलाची एक बाजू पूर्णतः कोसळली असल्याचा प्रकार मंगळवार दि.१४ रात्री घडला.सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भोर मांढरदेवी मार्गावर कायमच दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते.या मार्गावरील रस्त्याचे नवीन काम सुरू करण्यात आलेले असतानाच मंगळवार दि.१४ रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने वाघजाईनगर जवळील फुलाचा कठडा पूर्णता वीस ते पंचवीस फूट खड्ड्यात कोसळला आहे.बुधवार दि.१५ दिवाळी भाऊबीज असल्याने सकाळपासूनच रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.प्रवासी वाहन चालकांना तुटलेला पुलाचा कठडा दिसत नसल्याने वाहन चालवताना अचानकपणे या पुलावरून एखादे वाहन खाली खड्ड्यात पडल्यास मोठा अपघात होऊन एखाद्याला जीव गमवावा लागेल असे वाहनचालक तसेच स्थानिकांनी सांगितले.
COMMENTS