सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मनोज जरांगे यांची मेढा या तालुक्याच्या राजधानीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा दि.१८ नोव्हेंबर रोजी होत असून या सभेच्या जय्यत झाली आहे. पन्नास हजाराहुन अधिक मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याने ही ऐतिहासिक सभा होणार असल्याचा विश्वास जावली तालुका सकल मराठा संयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येत्या शनिवारी (दि. १८ ) रोजी दुपारी १२ वा. मराठा समाजाची ऐतिहासिक विराट सभा छ.शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित केली असुन सभेच्या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी मराठा बांधव मेढा शहरात येणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सभा मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार असून मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील सातारहून येणारी वाहतुक व्यवस्था वेण्णानगर मार्गे सावली पुलावरून महाबळेश्वरकडे असा सभा काळात बदल करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांचे विचार ऐकण्यासाठी सातारा, जावली, महाबळेश्वर तालूक्यातील मराठा बांधव मोठया प्रमाणात हजर राहणार असल्याने सर्वच प्रमुख रस्त्यावर देखील मोठी वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर मेढा पाचवड रस्ता, मेढा मुख्य बाजार चौक रस्ता, मेढा ते साताराकडे जाणारा रस्त्यावर मराठा समाज बांधवाची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
याबाबत मेढा पोलीस स्टेशनला निवेदन देणेत आले असून कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी तसेच येणाऱ्या मराठा समाजातील बांधवाना वाहतुकीस आडथळा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी याकरिता विनंती करणेत आली आहे.या सभेसाठी तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधव भगिनी यांनी आपल्या मुलांबाळासह तालुक्याच्या ठिकाणी हजर रहावे असे आवाहन जावली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करणेत आले आहे.
केळघर विभागाकडून येणाऱ्या वाहणांचे एसटी डेपो , कुसुंबी कडून येणाऱ्या वाहनांना वेण्णा चौक मोहाट रोडवर, पाचवड कडील वाहणांना पंचायतय समितीच्या वरील बाजुस तर सातार कडून येणाऱ्या वाहनांना आगलावेवाडी कडे पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सभा सर्वांना पहाता यावी म्हणून स्क्रीन बसविण्यात येणार असल्याचे संयोकांनी सांगीतले. यावेळी माजी आ. सदाशिव सपकाळ, माजी नगराध्यक्ष पांडूरंग जवळ, विलास बाबा जवळ, एस एस पार्टे गुरुजी , एकनाथ ओंबळे, विश्वनाथ धनावडे, हभप अतुल महाराज देशमुख , संतोष वारागडे, सचिन जवळ, सचिन करंजकर आदी संयोजक उपस्थित होते.