सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील श्रीक्षेत्र सोमेश्वर (करंजे ) येथील देवाची पालखी सोमवती अमावस्यानिमित्ताने निरा स्नानासाठी निंबुत येथे विसावली. दरवर्षी सोमवती अमावास्येला सोमेश्वराचा पालखी सोहळा निंबूत येथे नीरा नदीमध्ये स्नानासाठी विसावतो.
हे स्नान पूर्ण झाल्यानंतरच भाविक भक्तांना श्रीक्षेत्र सोमेश्वर येथे दर्शन घेण्याची परवानगी असते. सोमवती अमावस्या स्नान गेली कित्येक वर्षे झाली चालू आहे. श्रीक्षेत्र सोमेश्वर येथून चौधरवाड, गडदरवाडी, खंडोबाचीवाडी मार्गे पालखी सोहळा पायी वाजत गाजत निबूत येथे नीरा नदीकाठी आणली जाते.
निंबुत येथील पालखी स्नानाचा मान लकडे-पाटील कुटुंबाला मिळालेला आहे त्यांच्या कित्येक पिढ्या या पालखी स्नान घालत आहेत निंबुत मधील पालखी स्नानानंतर पालखी सोहळा विसाव्यासाठी भैरवनाथ मंदिर निंबूत येथे थांबवला जातो तेथील आरतीचा कार्यक्रम आटोपून त्यानंतर निंबूत येतील सतीश खंडेराव काकडे यांच्या वाड्यावरती पालखी सोहळ्या बरोबर आलेल्या भाविक भक्तांची प्रसादाची सोय केलेली असते या प्रसादाचा कार्यक्रम काकडे फॅमिली फार पूर्वीपासून करत आलेली आहे. नींबूत येथील भक्तांचे दर्शन आटोपून पालखी सोहळा पुन्हा वाजत गाजत सोमेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतो
COMMENTS