सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवुन समाज प्रबोधन पर देखावे सादर करावेत. उत्सव काळात कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. महिलांची मुलींची या काळात काळजी घ्यावी असे आवाहन करीत गणेश उत्सव शांततेत साजरा करावा अन्यथा नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी स्पष्ट संदेश दिले.
मेढा येथे घेण्यात आलेल्या गणेश उत्सव व ईद सणांच्या नियोजन बैठकीत बोलते होते. यावेळी नायब तहसिलदार सुनील मुनावळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महावितरणचे पवार, पत्रकार शशिकांत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे म्हणाले गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी धर्मादायुक्त सातारा यांच्याकडे मंडळाची नोंद करुन घेणे, पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने व ठरवून दिलेल्या वेळेतच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढावी. गणेश मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी महिलांची किंवा मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगुन पुढे म्हणाले गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये पारंपारिक वाद्य वापरण्यास आग्रही राहावे. गणेशोत्सव कालावधी मध्ये गणेश मूर्तीच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित मंडळाची राहील याची नोंद घ्यावी. पावसाचे दिवस असल्यामुळे मूर्तीचे संरक्षण करणे करिता मंडपात फक्त पडदे न बसवता पत्र्याचा वापर करावा. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ नये याकरिता गणेश मंडळांनी विद्युत पुरवठा निर्दोष असलेल्या बाबत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे प्रमाणपत्र प्राप्त करावे, अशा सूचना ताटे यांनी यावेळी दिल्या.
तसेच पृथ्वीराज ताटे पुढे म्हणाले मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश उत्सव अनुषंगाने विशेष उपाययोजना करिता गणेश गणराया अवॉर्ड 2024 स्पर्धेचे आयोजण करण्यात केले असून जास्तीत जास्त मंडळ यामध्ये सहभाग नोंदवावा तसेच यामध्ये रक्तदान शिबिर घेणे ,विधवा महिलांना आरतीला मान देणे, महिलाचा सन्मान करणारे उपक्रम राबवावेत, एक गाव एक गणपती सामाजिक उपक्रम राबवणे ,गाव स्वच्छता मोहीम राबविणे,असे समाज हिचाचे उपक्रम राबवावेत असे आवाहन करून ते पुढे म्हणाले पोलीस अधीक्षक सातारा याच्या तर्फे सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना अवॉर्ड देणेत येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अधिक माहिती देताना ताटे म्हणाले मा.पोलीस अधीक्षक सातारा यांच्यातर्फे उंच भरारी योजना राबणेत येत असून उदयोग प्रशिक्षणासाठी युवकांचा सहभाग नोंदवुन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी उंच भरारी योजनेसाठी सहभागी करावे असे आवाहन ताटे यांनी केले.
यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील,शांतता कमिटी सदस्य, पोलीस मित्र, हिंदू व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.