सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
निरा-मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती येथे निरा डाव्या कालव्याच्या वळणावर आयशर टेम्पोने एका १६ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यू नंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला आहे.
या अपघातात इजाज खुर्शीद सय्यद वय १६ रा. निरा (पोकळे वस्ती) ता. पुरंदर याचा मृत्यू झाला आहे.
आयशर टेम्पो क्र. एमएच १२ एफझेड ३३१९ या टेम्पोने सायकलवर असलेल्या इजाजला जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ट्रक आणि सायकलच्या झालेल्या धडकेनंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुळूंचे नजीक त्याला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे एक चाक या मुलाच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. संतप्त जमावाने हा ट्रक रस्त्यावरतीच पेटवून दिला. अधिक तपास करंजेपुल पोलीस करत आहेत. अमरजित भागवत बोकारे रा. लातूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.