Phantan Breaking l बीबी येथील तलावात दगडाला बांधलेल्या स्थितीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळला : घातपाताची शक्यता

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील फलटण-सातारा या मार्गावर बीबी फाटा नजीक असणाऱ्या तलावात अज्ञाताचा मृतदेह आढळून आलेला आहे.
        आज दि.३१ रोजी सायंकाळच्या सुमारास लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील बीबी येथील तलावात एक मृतदेह दगडाला बांधलेल्या स्थितीत पाण्यावर तरंगत असलेला दिसून आल्यानंतर खळबळ उडाली. ही बाब शनिवारी सायंकाळी 6 वाजता अनेकांच्या निदर्शनास आली .मृतदेह ची स्थिती पाहता घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटना स्थळी पोलीस पोहोचले असून सदर मृतदेहाची ओळख पटली नसून हा मृतदेह नक्की कोणाचा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय पोलीस तपासाला वेग येणार नसल्याचे बोलले जात आहे.
To Top