पुरंदर l नीरा शहरात पैगंबर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
नीरा ( ता.पुरंदर) येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या १४४६ व्या जयंती निमित्त स्टेशन मस्जिद, नीराच्या  वतीने भव्य मिरवणूक  काढण्यात आली.
              नीरा ( ता.पुरंदर) येथे पैगंबर जयंतीनिमित्त 
गुरूवारी( दि.१९) सालाबादप्रमाणे स्टेशन मस्जिद पासून लोणंदरोड , नगररोड ,बुवासाहेब चौक, अहिल्यादेवी चौक, शिवाजी चौक मार्गे पुन्हा लोणंदरोड व मस्जिद पर्यंत अशी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या दर्गाहच्या ' गुंबद- ए- खिजरा' च्या  प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीमध्ये लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत नागरिक उपस्थित होते. नार- ऐ- तकबीर , अल्लाहू अकबर , नार - ऐ- रिसालत, या रसुलुल्लाह अशा प्रकारे विविध घोषणा देेेेऊन  लहानमुले , तरूणांनी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या विषयी आदर व्यक्त केला.

       स्टेशन मस्जिदमध्ये  महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पैगंबर जयंती निमित्त 
जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे
पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी सभापती  दत्ताजीराव चव्हाण, नियोजन मंडळाचे‌ सदस्य विराज काकडे,‌ समर्थ पतसंस्थेचे चेअरमन 
राजेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे , अनंता शिंदे, मार्केट‌ कमिटीचे संचालक‌
विक्रम दगडे, विजय शिंदे, दिपक काकडे,डॉ.वसंतराव दगडे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
     मिरवणूकीतील लहान मुलांना उपसरंपच राजेश काकडे यांच्यावतीने  खाऊचे वाटप, तसेच मुस्लिम 
समाजातील युवकांच्या वतीने  गिफ्ट देण्यात आले.
          सिकंदर शेख, मन्सुर सय्यद, समीर शेख, जलील काझी, असिफ तांबोळी, जावेद आतार, हाशिम सय्यद, नदीम सय्यद, जावेद शेख, शफीक कुरेशी, एजाज  पठाण, मुस्तकीम शेख व  मुस्लिम समाजातील बहुसंख्य मुस्लिम तरूण कार्यकर्त्यांनी‌  ‌पैगंबर जयंतीसाठी विशेष परिश्रम घेतले.
          दरम्यान नीरा पोलिस दुरक्षेञाचे सहाय्यक फौजदार रविराज कोकरे, पोलिस हवालदार संतोष मदने,नीलेश करे , पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
To Top