Baramati Breaking l दीपक जाधव l शिरवळची पोरं.. सुपे, भोर, वेल्हा, सातारा व हडपसर भागातील मंदिरातील मुर्त्यांवर मारायचे डल्ला : सुपे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा भाग असलेल्या मंदिरातील देवांची मुर्ती, मुखवटे, घंटा, समई तसेच मुष्शक आदी चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याची दमदार कामगिरी सुपे पोलिसांनी केली आहे. यावेळी सुपे पोलिसांनी फिल्मी टाईल्सने लोणंद पर्यंत पाठलाग करीत तिघांना अटक केल्याची घटना सोमवारी ( दि. १६ ) पहाटे घडली. 
         ओमकार शशिकंत सांळुखे ( रा. आनंदपुर ता. वाई सध्या रा. शिरवळ, पंढरपुर फाटा ता. खंडाळा जि. सातारा ), तुषार अनिल पवार ( रा. दत्तनगर सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा ), सौरभ दत्तात्रय पाटणे ( रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा ) आदीं तिघांना अटक केली आहे तसेच या गुन्ह्यात  एक विधीसंघर्ष बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
    पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सुपे पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना दंडवाडी गावच्या हद्दीत एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो कार क्र. ( एम.एच.१२ सी.डी. ६७५७ ) रस्त्याच्या कडेला नंबरप्लेटवर चिखल लावुन संशयीतरित्या थांबलेली दिसली. यावेळी गस्तीतील अंमलदार गाडीजवळ जाताच गाडीतील इसमाने गाडी वेगात सुपे बाजुकडे घेवुन गेला. त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणहुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यावेळी पोलिस अंमलदार यांनी या घटनेची माहिती सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. त्यानंतर नवसरे तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी आले. अल्टो कार घेवुन पळालेल्या इसमाचा पोलिस कर्मचारी सचिन दरेकर आणि सागर वाघमोडे यांनी पाटलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंद येथुन ताब्यात घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेवुन पळालेल्या इसमांना देखील येथील पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडुन गेल्या १०७ वर्षापुर्वीच्या पानेश्वराची मुर्ती, दोन मुकुट, दोन समई, एक पंचार्थी, मुष्शक, १५ लहान मोठ्या घंटा आदी माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 
        या चोरांनी सुपे, भोर, वेल्हा, सातारा, वाठार आणि हडपसर आदी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आदी पोलिस ठाण्यात गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार, विभागिय पोलुस अधिकारी सुर्यदर्शन राठोड यांनी ही माहिती दिली. तसेच यातील पाटणे या आरोपीस २१ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर इतर दोघांना गुरुवारी ( दि. १९ ) कोर्टात हजर करण्यात आले असुन चौथा आरोपी विधीसंघर्ष बालक असुन त्यास नोटीस बजावण्यात आल्याचे सपोनी मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले.  
      जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली सपोनि मनोजकुमार नवसरे, स.पो.नि.कुलदिप संकपाळ, पो.स.ई. जिनेश कोळी, सहा. फौजदार कारंडे, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो.कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, रुषीकेश विर, होम. शिवतारे आदींनी ही कामगिरी केली आहे.
             ...............................
To Top