सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता. बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघळवाडी शाळेसाठी चंदूकाका सराफ अँड सन्स या सुवर्णपेढीकडून सी एस आर च्या माध्यमातून आरओ पिण्याच्या पाण्याचा फिल्टर आणि शाळेस दैनंदिन कार्यालयीन उपयोगा करता एक प्रिंटर भेट देण्यात आला.
या कामी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुका उपाध्यक्ष ओंकार साळुंखे यांच्या प्रयत्नातून ही मदत शाळेस मिळाली असून या भेट प्रसंगी चंदुकाका सराफ पेढीचे सेल्स हेड दीपक वाबळे, मार्केटिंग विभागाचे धनंजय माने, बारामती उद्योग सेल अध्यक्ष राजेंद्र जगताप, सोशल मीडिया उपाध्यक्ष राहुल जाधव, वाघळवाडी गावचे सरपंच हेमंत गायकवाड, युवक उपाध्यक्ष. प्रदीप शेंडकर जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख दगडे सर. व वाघळवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
ओंकार साळुंखे यांच्या या कामाचे ग्रामस्थानी कौतुक होत असून, येणाऱ्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून ट्रस्ट स्थापन करून सोमेश्वर गावासाठी विविध सामाजिक उपक्रम अंमलात आणण्याचा त्यांचा मनोदय असून, या कामी शाळेने आणि सर्व ग्रामस्थानी चंदुकाका सराफ पेढीचे सर्व टीमचे आभार व्यक्त केले.