सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भाटघर जलाशयाच्या पश्चिमेकडील ३२ गाव खोऱ्यातील वाढाणे ता.भोर येथे आठ दिवसात कालवड व खोंडाचा बिबट्याने फरशा पाडल्याची घटना घडली.या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तात्काळ वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बहिणीत नागरिकांकडून होत आहे.
वाढाणे ता.भोर येथील खाजगी तसेच जंगल परिसरात बिबट्याचा वावर मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वाढला आहे.बिबट्याने मागील आठ दिवसांपूर्वी गायीच्या कालवडीवर हल्ला करून ठार केली होती तर गुरुवार दि.२८ रोजी खाजगी रानात शेतकरी राजेंद्र गुलाब बोडके हे जनावरे चारत असताना जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक खोंड जंगल परिसरात ओढून नेत ठार केला. शेतकऱ्याने इकडे तिकडे खोंडाचा शोध घेतला मात्र काही तासांनी तीस ते चाळीस हजार रुपये किमतीचा खोंड शेतकऱ्याला झाडाझुडपात मृत अवस्थेत आढळून आला.वाढाने परिसरात सध्या बिबट्याच्या वारंवार पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.