Big Breaking ! वाईच्या पसरणी घाटात 'द बर्निंग कार"चा थरार : भाऊ बहीण सुखरूप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ 
वाईच्या पसरली घाटात दुपारी आडीच वाजण्याच्या सुमारास  कार जळुन खाक झाली. 
         घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की 
पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार कृष्णा बसवत वय ४० आणी सुजीता कृष्णा बसवत हे बहीण भाऊ आपल्या टाटा टिगर कार क्रमांक एम. एच .०१ डी.पी.!०८५१ मधुन महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी साठी दि.१४ रोजी जात असताना दुपारी त्यांची कार पसरणी  घाट चढताना कारच्या बोनेट मधुन अचानक धुर येवु लागल्याचे कार चालक ओंकार बसवत  यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कार घाट रस्या कडेला ऊभी करुन पुढील बोनेट ऊघडले असता कारने अचानक पणे पेट घेतला बघता बघता आगीने उग्र रुप धारण केले आणी क्षणार्धात कार जळुन खाक झाली .
           या घटनेची  माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना आणी पाचगणी पोलिस ठाण्याचे पिएसआय यशवंत महामुलकर सहाय्यक फौजदार अरविंद माने यांना समजताच या दोन्हीही अधिकार्यांनी वाई आणी पाचगणी नगर परिषदेचे अग्नी शमक बंब मागवून कारला लागलेली आग विझवली या वेळी पाचगणी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या तुमलेली वाहतुक पोलिसांनी सुरळीत केली .

To Top