सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुनील जाधव : वडगाव निंबाळकर
आज दि १४ रोजी वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेसमोर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, रायझिंग स्टार स्कूल येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रांगोळी गुरुजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वर्धमान महावीर व महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. यावेळी वडगाव निंबाळकर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे फणसे, चौधरी, जगताप व इतर कर्मचारी यांनी हजेरी लावली. प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीं गायकवाड, प्रवीण कांबळे, उपस्थिती होते. सर्वजण एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश देत थोर मानवास अभिवादन केले. तसेच यावेळी राजेश्वर राजेनिंबाळकर, बाबा शिंदे, धैर्यशील राजेनिंबाळकर, नाना मदने, दादा निंबाळकर, सचिन साळवे, संजय साळवे, सचिन गायकवाड,राजेश्वरी साळवे,सदस्य खोमणे ,संगीता शहा, क निलेश साळवे,गणेश रांगोळे,मयुरी साळवे, भूषण दरेकर,अमोल गायकवाड, छोटू जाधव,संतोष पवार, राहुल आगम, साळवेपरिवार ,किशोर साळुंखे, अनिल जाधव, सचिन साठे,अभी साळवे,नंदू जाधव,संतोष दरेकर,सोनू राऊत अनेक ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली. सचिन साळवे यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली. तसेच रायझिंग स्टार स्कूल येथे अमोल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.