कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला : दि १६ रोजी शिक्कामोर्तब

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. काँग्रेसकडून जयश्री जाधव  तर भाजपकडून सत्यजित कदम  यांच्यात मुख्य लढत आहे. या पोटनिवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर उत्तरचा कौल यापैकी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मतमोजणी शनिवारी (दि. १६) होणार असून, फक्त तीनच तासांत निकाल लागणार आहे.
         कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण १५ उमेदवार होते. पोटनिवडणुकीचे मतदान १२ एप्रिलला झाले असून, निकाल १६ एप्रिलला लागणार आहे. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात मतमोजणी सुरु होईल. टपाली मतदानासाठी एक आणि ईव्हीएम मशिनच्या मतदानासाठी १४ असे एकूण १५ टेबलवर आणि २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी राखीवसह सव्वाशे अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. त्यामुळे फक्त तीनच तासांत मतमोजणीचा निकाल जाहीर होईल, असा अंदाज आहे.
To Top