सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दि.१४ एप्रिल २०२२ रोजी निंबुत येथील, निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व वर्धमान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने दि. १३ एप्रिल २०२२रोजी, विद्यालयात इ.५ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांसाठी, निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात (इ.५ वी ते ८वी) प्रथम क्रमांक- बनसोडे सानिका लालासो, द्वितीय क्रमांक-.लकडे अपेक्षा राजेंद्र, तृतीय क्रमांक- .साळवे हर्षदा अनिल व उत्तेजनार्थ- केंजळे वेदांत चंद्रकांत, मोठ्या गटात (इ. ९वी) प्रथम क्रमांक. शेख महेक जावेद, द्वितीय क्रमांक-. माने दिपाली संतोष, तृतीय क्रमांक- . पवार अनुजा राजू ,उत्तेजनार्थ- पवार चमेली धर्मराज, या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, दिपाली ननावरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वर्धमान महावीर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. व आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक. जयप्रकाश सरक यांनी भारतीय संविधाना बद्दल माहिती सांगितली. रणजित काकडे यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वर्धमान महावीर यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले व वर्तमान स्थितीत या विचारांची आवश्यकता स्पष्ट केली.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे मानद सचिव मदनराव काकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राज्यघटनेतील योगदान व वर्धमान महावीर यांची पंचमहाव्रते याबद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे उपाध्यक्ष भीमराव बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . राजाराम भगत यांनी केले तर आभार विजय सूर्यवंशी यांनी मानले.