बारामती ! सह्याद्री पब्लिक स्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिनांक- 13 एप्रिल रोजी एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल येथे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली . विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित सुरेख नाटक सादर करून विद्यार्थ्यांची व शिक्षकांची दाद मिळवली.  आंबेडकरांचा 'वाचाल तर वाचाल' हा मंत्र प्रेरणास्थान मानून विद्यार्थ्यांनी स्वतः वाचलेल्या पुस्तकांविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील तनिष्का सकुंडे व आकांक्षा यादव या विद्यार्थिनीनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनश्री सावंत, किशोरी काकडे  व. अनुराधा खताळ  यांनी भूषविले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री अजिंक्य सावंत, सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री अजित वाघमारे सर, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
To Top