सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर येथील एस.टी बस स्थानकाजवळील भारतरत्न डाँ.आबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आंबेडकरी विचारांचे सर्व संघटनांच्या वतीने व भोर तालुका प्रशासन आणि भोर नगरपालिका प्रशासनाचे वतिने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन केले.
भोर शहारात गुरुवार दि-१४ संपन्न झालेल्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध संघटांनी यावेळी लहान थोरांसह हजेरी लावून आंबेडकर यांना अभिवादन केले.यावेळी भोर तालुका प्रशासनाचे वतीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगराध्यक्षा सौ.निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, नगरसेविका रुपाली कांबळे, नगरसेवक अमित सागळे,नगरसेवक गणेश पवार यांचेसह भिमज्योत तरुण मंडळाचे रवींद्र कांबळे, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे डाँ.प्रा.रोहिदास जाधव, डाँ.प्रदिप पाटील, डाँ.अरुण बुरांडे, काँ.ज्ञानोबा घोणे, अनिसच्या सविता कोठावळे,शहराध्यक्ष नितीन धारणे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,पञकार भुजंगराव दाभाडे,चंद्रकांत जाधव,संतोष म्हस्के,किरण रनखांबे, भिम आर्मिचे महेंद्र साळुंके, भारीप बहुजण महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते, यांचेसह आंबेडकरी चळवळीतील नागरीकांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.सकाळी १० वाजता सामुहिक धम्मवंदना घेण्यात आली.यानंतर भिमगीतांचा कार्यक्रम होवून डाँ.बाबासाहेबांचे प्रतिमेची सजवलेल्या रथातुन मिरवणुक काढण्यात आली.तर तालुक्यातील खेडोपाडी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.