सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
बदल
बदल ,
तसा खूप लहान शब्द
पण घडतो जेव्हा सगळेच होतात स्तब्ध
ऋतू बदलतात,
दिवस बदलतात ,
किमती बदलतात,
नाती बदलतात ,
माणसेही बदलतात,
मग तूच का नाही???
बदल तू ही आता…...
जागव तुझ्याही भावना
का नेहमी लपंडाव खेळत जगतेस? शोध घे आता जरा स्वतःचाही
नेहमी तर तूच झटतेस,
मग तरीही तूच का नमतेस ???
सोड जरा त्याच त्या संकुचित परंपरा आणि घे स्वप्नांची उंच भरारी,
गगनालाही कळू दे तुझ्या स्वप्नांचा ठाव
तरच तुला मिळेल कुठेतरी वाव.
बदल तुही आता ........
देत तर आलीसच नेहमी
आता घे जरा काही स्वतःसाठी, सगळेच म्हणतात बदल तर आहे निसर्गाचा नियम
मग बदल तुही आता.......
मग बदल तू ही आता........
दिपाली आनंद गायकवाड