सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील काटी येथील ओंकार दादाराम मोहिते वय २२ वर्ष या युवकाचा शेतात काम करत असताना वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना दि ७ रोजी सायंकाळी घडली.
सविस्तर माहिती अशी की, ओंकार दादाराम मोहिते हा आपल्या शेतामध्ये मंगळवार रात्री उशिरापर्यंत काम करत होता यावेळी अवकाळी पावसाच्या विजांचा कडकडाट होत होता. यातच ओंकारच्या अंगावरती वीज कोसळली त्याला तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत तुकाराम भिवा मोहिते यांनी इंदापूर पोलिसात खबर दिली आहे.