भोरला मोफत आरोग्य शिबिरात शेकडो महिलांची तपासणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथील मेदिनी हॉस्पिटल व सिपाका अतिदक्षता विभाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोर यांच्यामार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले होते. शिबिरात शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर औषधे मोफत देण्यात आली.
      तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते.महिलांच्या आरोग्य तपासणीत सांधेदुखी गुडघेदुखी ,मणक्याचे आजार तसेच महिलांकरिता थायरॉईड,बीपी, शुगर आणि अस्थमा यावर उपचार आणि मार्गदर्शन केले गेले. तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ.अनुपम जयस्वाल,डॉ. प्रदीप पाटील, डॉ. विजया पाटील, संतोष शेडगे ,प्रतीक्षा पालकर, मनीषा राजवडे, नीता जाधव होते.
To Top