सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बुधवार दि.८ "जागतिक महिला" दिनानिमित्त भोर नगरपरिषद व ग्रीनि -पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने टाकाऊ वस्तु पासून केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भोर नगरपरिषद हॉलमध्ये भरविण्यात आले होते.यामध्ये गर्ल्स हायस्कूल येथील २० व गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या २१ मुले, मुली यांनी उत्तम प्रकारच्या कलाकृतींचे सादरीकरण केले.
या प्रदर्शनात उत्तम कलाकृती केलेल्या गर्ल्स हायस्कूल मधील अनुक्रमे- वेदिका खाटपे,संस्कृती वेणुपुरे,माहीम शेख यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मधील अनुक्रमे पार्थ कोठावळे,शुभम बांदल,प्रणव खोपडे यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आले.विजेत्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष निर्मलाताई आवारे, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण केले गेले.यावेळी प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून क्लॉथ(कापडी पिशवी) वेंडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष समीर सागळे व सर्व नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.