भोर ! संतोष म्हस्के ! वरंधा घाटात दोन वेगवेगळ्या अपघातात चालक गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भोर- महाडला जोडला जाणाऱ्या वरंधा घाटात बुधवार दि.८ एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन चारचाकी वाहनांचा अपघात होण्याची घटना घडली असून या अपघातात चालक गंभीर जखमी आहेत तर इतर प्रवासी सुखरूप आसल्याचे समोर आले आहे.                                     
          बुधवार दि.८ सकाळी नऊच्या दरम्यान स्वतःच्याच ओमिनी मारुती गाडीने रत्नागिरीवरून पुणेकडे येत असताना वरंधा घाटातील हिर्डोशी ता.भोर जवळील खिंडीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खड्ड्यात धडकली.यात चालक गंभीर जखमी झाला असून भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर इतर ३ महिला व २ लहान मुले हे बालंबाल बचावले.तसेच दुपारी २ च्या दरम्यान महाडवरून भोरला येत असताना देवघर ता.भोर येथे इनोव्हा या चारचाकी वाहनाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्यांना जाऊन धडकल्याने अपघात झाला.गाडीचे मोठे नुकसान झाले मात्र चालक सुखरूप आहे.

To Top