सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीचा विसर पडला असून रविवार दि.२३ नगरपालिकेत जयंती साजरी केली नसल्याने भाजप,राष्ट्रवादी तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन नगरपालिका आवारात बाळ गंगाधर टिळक यांचे फोटोचे पूजन करीत जयंती साजरी केली.तर विसरभोळ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भोर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
महापुरुषांची शासकीय जयंती साजरी करण्याचे महाराष्ट्र शासनाचे निर्देश असतानाही देशाचे समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती रविवार दि.२३ नगरपरिषद भोर यांनी साजरी केली नाही.नगरपरिषदेच्या आवारात भाजपा राष्ट्रवादी तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जयंती साजरी करीत आक्रमक होत भोर पोलिसांना निवेदन दिले.यावेळी भोर शहर शिवसेना प्रमुख आप्पा सोनवले ,राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे,भाजपा उपाध्यक्ष पुणे जिल्हा राजेंद्र गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS