सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील साईसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीरास रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या शिबीराचा तब्बल ४०० रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. विद्यानंद भिलारे आणि डॉ. राहुल शिंगटे यांनी दिली.
डॉक्टरांच्या सल्ल्याने ६६०० रुपयांच्या तपासण्यात १७० रुग्णांना लाभ मिळाला. तर २० रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शिबीरात मधुमेह, हृदयरोग, दमा, रक्तदाब, थायरॉईड, मणक्याचे विकार, संधीवात, हार्निया आदी तपासण्या करण्यात आल्या. सोमेश्वरनगर, निरा, साखरवाडी, फलटण या परीसरातील रुग्णांनी शिबीरात सहभाग घेतला.
हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, फुफ्फुसातील दम्याची पातळी, ईसीजी, चरबीचे प्रमाण, थायरॉईड, वजन, हाडांची घनता व इतर आजारांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. साईसेवा हॉस्पिटल बारामतीच्या पश्चिम भागातील रुग्णांसाठी वरदान ठरले असून अनेक अपघातग्रस्तांना वेळेत मदत व उपचार मिळाले आहेत. हॉस्पिटलमध्ये सर्व विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा तसेच सर्व सरकारी योजना लागू करण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांना याचा लाभ मिळत आहे. वार्षिक सभासद योजना तसेच साईसेवा संजीवनी कार्ड सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनाही याठिकाणी सुरू करण्यात आली आहे. शिबीरासाठी डॉ.विद्यानंद भिलारे, डॉ. शुभम शहा, डॉ. सागर शिंदे, डॉ.क्षितीज कोठारी, डॉ.राहुल शिंगटे, डॉ. निता शिंगटे, डॉ. जयश्री भिलारे यांनी सहकार्य केले.