पुरंदर ! नीरा डाव्या कालवा अस्तरीकरण विरोधात नीरा परिसरातील नऊ गावे एकवटली : अस्तरीकरण झाल्यास आंदोलनाचा पावित्रा

Admin
रिपोर्टर रिपोर्टर टीम----
निरा : प्रतिनिधी
वीर धरणाच्या डाव्या कालव्यावर पुरंदर तालुक्यातील एकूण नऊ गावे अवलंबून आहेत या गावातील शेतकऱ्यांची अस्तरीकरणा विरोधातील बैठक नीरा शिवतक्रार येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या नऊ गावातील बहुसंख्य शेतकरी या बैठकीस उपस्थित होते. 
       धरणाच्या डाव्या कालव्या लगत असणाऱ्या सर्व विहिरी बोअरवेल तसेच ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याच्या विहीर लिफ्ट योजना या कालव्यावरील गळातीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. निरा डाव्या कालव्याच्या पिंपरे  नजीक बेंदवस्ती येथील चाललेल्या अस्तरीकरण कामामुळे येथील शेतकरी दास्तवला आहे. व या अस्तरीकरणाच्या चाललेल्या कामाविरोधात आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. 
या बैठकीमध्ये कालव्याचे कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरण होऊ देणार नाही अशी मागणी या नऊ गावातील शेतकऱ्यांनी एक मुखाने केली पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करावी अन्यथा या निर्णयाविरोधात उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. 
       या बैठकीमध्ये जेऊर मांडकी. पिसूटी  पिंपरे खुर्द निरा शिवतक्रार राख गुळूंचे कर्नलवाडी थोपटेवाडी येथील येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. अस्तरीकरणाचे काम थांबले नाहीत तर सर्व नऊ गावातील ग्रामस्थ पुणे पंढरपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक नीरा शिव तक्रार. ता. पुरंदर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
To Top