Bhor Breaking ! नसरापूरला घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 भोर : संतोष म्हस्के
 नसरापुर ता. भोर येथे बंद घराचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह इतर घरातील वस्तू २ लाख ५४ हजार रुपयांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून राजगड पोलिसात राजेश शामराव कदम रा.नसरापूर यांनी फिर्याद दिली आहे.
        राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात इसमांनी शुक्रवार दि.२२ पहाटेच्या वेळी राजेश कदम यांचे बंद घराचे कडे कोंयंडा चोरट्यांनी तोडून १ लाख ५० हजार किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने,५० हजारांच एक किलो चांदीचे ताट, तांब्या, वाटी ,५० हजार रुपयांची ८ घड्याळे तर ४ हजारांचा तांब्याचा पंप असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक ए.बी.घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोस ई सूतनासे करीत आहेत.

                                   
To Top