सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी ता. बारामती येथील शंभूराजे तानाजीराव सोरटे याची नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नगर सहाय्यक पदावर निवड झाली आहे.
शंभूराजे सोरटे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सोरटेवाडी येथे झाले असून बीटेक ची पदवी मिळवली आहे. शंभूराजे याचे वडील तानाजीराव सोरटे हे येथील सोमेश्वर कारखान्यात साखर कामगार म्हणून काम करतात.