सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
कोकणात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड प्रशासनाने वरंधा ता.भोर घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची हद्द असणाऱ्या ठिकाणी मुरूम मातीचे ढिगारे लावून रस्ता लहान-मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी शुक्रवार दिनांक २१ रात्रीपासून पूर्णतः बंद केलाचा आदेश रायगड प्रशासनाने दिले आहेत.
हवामान खात्याकडून कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.घाट रस्त्यावर अतिवृष्टी काळात अनेक वेळा मोठमोठ्या दरडी कोसळतात तर झाडे पडून रस्ता खचतो परिणामी मोठमोठे अपघात होण्याची संभावना असते.या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर रायगड प्रशासनाकडून दगड मातीचे ढिगारे लावण्यात आले असून वरंधा घाटातून ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रस्ता बंद केला गेला आहे.