पुरंदर ! नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरण विरोधात पुरंदर तालुक्यातील शेतकरी एकवटला : अस्तरीकरण न थांबल्यास आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पिंपरे (बेंदवस्ती ) येथील कॅनॉलच्या चाललेल्या अस्तरीकरणामुळे निरा व निरा परिसरातील शेतकरी धास्तावला आहे व या अस्तरीकरण विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. 
         वास्तविक कॅनॉल अस्तरीकरणामुळे पुरंदर व लगतच्या बारामती तालुक्यातील कॅनॉल वरील असलेल्याअनेक लिफ्ट योजना तसेच कॅनॉल शेजारी अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून विहिरी खणून शेतीसाठी चार ते पाच किलोमीटर पाईपलाईन करून आठ माही व बारमाही पिके घेतात या कॅनॉल लगतच्या सर्व विहिरी या कॅनॉल पाण्याच्या परक्युलेशन वरती अवलंबून आहेत तर काही ग्रामपंचायतींनी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी विहीर लिफ्ट योजना केलेल्या आहेत ग्रामपंचायतच्या या सर्व लिफ्ट योजना देखील कॅनॉल पाण्याच्या पर्क्युलेशन वरती अवलंबून आहेत
परंतु शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून कॅनॉल लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अस्तरीकरणाचा घाट घातला जात आहे शासनाने असं काही ठरवले का की शेतकऱ्याच्या तोंडाचे पाणीच पळवायचे
तरी या अस्तरीकरणाचा व्यवस्थित अभ्यास करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी पुरंदर तालुक्यातील निरा व पिंपरे परिसरातील शेतकऱ्याची आहे. संबंधित खात्याने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अस्तरीकरणाचे काम चालू ठेवल्यास शेतकरी आक्रमक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.
To Top