राजगड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी एस.एस.माने

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 वेल्हे ; मिनल कांबळे
राजगड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी एस एस माने यांची बिनविरोध निवड झाली आहे.
         महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा राजगड वेल्हे अध्यक्ष पदी  एस एस माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अरुण आवळे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष पदाच्या निवडी साठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. निरीक्षक म्हणून  पुंडलिक  मस्के  पद्माकर  डोंबाळे 'तुषार काशीद  यांनी काम पाहिले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामसेविका उपस्थित होत्या.
To Top