जावली l अवैद्य धंद्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकीच्या तपासण्या : तर तडीपारांना मात्र मेढा पोलिसांचे अभय

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यात अवैध धंद्यांना उत आला असताना त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही. परंतु दारुच्या नावाखाली सामान्य नागरीकांच्या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या स्कुटींच्या तपासण्या करून सामान्य नागरीकांना हैराण करणाऱ्या पोलीसांची जोरदार चर्चा सुरु असुन तडीपारांपुढे मात्र पोलीसांची शरणगती असल्याचे बोलले जात आहे.
           जावली तालुका हा दारुमुक्त करण्यासाठी अनेक महिलांनी अंदोलने करीत जावलीतून दारू हद्दपार केली. जावलीतून दारू हद्दपार झाली असे वाटत असताना पोलीसांच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा तालुक्यात दारूचा महापूर वाहु लागला आहे. 
             तालुक्याला नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक लाभले असुन त्यांनी याबाबतीत लक्ष घालण्याची अपेक्षा सामान्य नागरीका मधुन व्यक्त होताना दिसत आहे. तर जुने जाणते अनुभवी कर्मचारी मात्र वरिष्ठांना अंधारात ठेवुन स्वतःची पोळी भाजण्यासाठी परस्पर अवैध धंदे सुरु ठेवत असल्याचे दिसून येत आहे. 
            तालुक्यात आज पर्यंत किती लोकांना तडीपार केले आणि त्यातील तालुक्यात किती आले हे उघडया डोळ्यांनी पहाणारे पोलीस तडीपारांना पाहुनही त्यांच्यावर काहीच कारवाई करताना दिसुन येत नाहीत. तडीपारांना शरण येणाऱ्या पोलीसांच्या दुर्लक्षाचे गौडबंंगाल काय असेल असा प्रश्न सामान्यांना पडला असुन याची वरिष्ठांनी चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी जनतेतून होत आहे. महिणा , दोन महिण्यापूर्वी तडीपार पोलीसांना तुरी देवुन पोलीस ठाण्यातून पळुन गेल्याची जोरदार चर्चा होती.
            तालुक्यातील जुन्या धंदेवाल्यांना ( मंथली बाज) डोळेझाक करून नविन धंदेवाल्यांच्या (मंथलीसाठी ) सामान्य  नागरीकांच्या गाड्या चेक करून त्रास देणाऱ्या पोलीसांच्या कामगीरीवर जनतेत नाराजी पसरली आहे. 
             तालुक्याला नुतन लाभलेल्या डॅसिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे अवैध धंदयांबाबत काय भुमिका घेतात याबाबत जनतेत उच्छुकता लागुन राहीली आहे.
To Top