सोमेश्वरनगर दि २६:
सोमेश्वरनगर परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या किराणा, औषध दुकानासमोर ग्राहकांनी सुरक्षित अंतर
ठेवून किराणा साहित्य घेण्यासाठी गोल ,चौकोनी पट्टे रंगविले आहेत. ग्राहकांनी देखील सहकार्य करत चौकोनात सुरक्षित अंतर ठेवून वस्तू खरेदी केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांना गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ही गर्दी रोखण्यासाठी व एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी सर्व दुकानासमोर चौकोनी पट्टे आखण्यात आले आहेत. ग्राहकांना या पट्ट्यांमध्ये उभे राहूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.