येवले अमृतूल्य यांच्य वतीने दिव्यंगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
नीरा दि:१० एप्रिल
कोरोना कोव्हिड१९ विषाणूचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक झाली आहे . त्यामुळे रोजंदारी कामगारांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यातच दिव्यांगांना तर अधिकच झळ भासु लागली आहे. नीरेतील दिव्यांगांची ही अडचण येवले अमृतूल्य यांच्य निदर्शनास सुरेखा ढवळ यांनी आणुन दिलं. येवले अमृतूल्य यांच्य वतीने नीरेतील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
प्रहार अपंग संघटनेच्या राज्याध्यक्षा सुरेखा ढवळ यांच्या विनंतील मान देऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध येवले अमृतूल्य यांचे संस्थापक निलेश येवले यांनी संपूर्ण पुरंदर तालुक्यातील दिव्यांगांन आवश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले. यापुर्वीही येवले यांनी पुरंदरच्या पश्चिमेकडील पट्टयात सॅनीटायजर, मास्क आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले आहे. यावेळी पत्रकार गणेश लोणकर, भरत निगडे, सुरेखा ढवळ उपस्थित होत्या.