वाघळवाडी येथे २० कुटुंबाला किराणा मालाचे वाटप

Pune Reporter
वाघळवाडी येथे २० कुटुंबाला किराणा मालाचे वाटप

सोमेश्वरनगर   दि  ४

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बंद असल्याने मजुरांना मोठा फटका बसल्याने त्यांच्या मदतीला महसूल विभाग धाऊन आला आहे.
वाघळवाडी येथील आंबेडकर वसाहत मधील 20 कुटुंबाना किराणा वाटप करण्यात आला.यामध्ये तांदूळ, तेळ, साखर, डाळी, मसाला, हळद, मीठ आदी गोष्टी यामध्ये देण्यात आल्या आहेत. घरातील किराणा संपल्याने आणि रोजगार नसल्यामुळे किराणा कसा खरेदी करायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. अजुन 14 तारखेपर्यंत भारत बंद रहाणार असल्याने घराच्या बाहेर पडता येणार नसल्याने महसूल विभागाच्या अधिकारी वर्गाने सामजिक बांधीलकी जपत स्वखर्चाने किराणा कुटुंबाच्या हाती आज दिला. 
प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे , तहसिलदार विजय पाटिल यांच्या सुचनेनुसार वडगाव निंबाळकर विभागाचे मंडळ अधिकारी संजय बाबुराव माने, तलाठी अरुण ज्ञानदेव होळकर ,आशपाक हनिफ इनामदार ,मधुकर मारुती खोमणे, दादासाहेब आगम , हिम्मत भंडलकर यांनी आज कुटुंबाच्या घरी येऊन मदत पोहच केली


To Top