कोथिंबीरीत शेतकऱ्यांना छप्पर 'फाडके' पैसे.. एका एकरात तब्बल ४ लाख ५१ हजार

Admin
कोथिंबीरीत शेतकऱ्यांना छप्पर 'फाडके' पैसे.. एक महिन्यात ५० लाखांची उलाढाल*

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

या देशात शेतकरीच राजा होणार, शेतीवर नाराज होऊ नका... काळी आई कालही सोनं देत होती, आज ही सोनं देतेय आणि उद्याही सोनं देणार.. या इंदुकीकर महाराजांच्या वाक्याची प्रचिती आज सर्वांना येत असेल, बारामती तालुक्यातील  मुरूम आणि वाणेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर या पिकात तब्बल ५० ते ५५ लाख रुपये कमावले आहेत. 
              ही बाब सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी असली तरी पण खरी आहे. लोकडाऊन च्या काळात शेतकऱ्याच्या पिकाची अक्षरशः धूळधाण झाली. लाखो रुपये खर्च करून तरकारी पिकांमधून बकरी सोडावी लागली, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तरकारी पिकाला समाधानकारक दर मिळू लागले आहेत. यात कोथिंबीर पिकाने जादा भाव खाल्ला आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या जुडीला तब्बल ५०  रुपये दर मिळत आहे. त्यामुळे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करत आहेत. वाणेवाडी, मुरूम आणि मळशी या तीन गावातील शेतकऱ्यांनी २७ एकर कोथिंबिरीतुन तब्बल ५० लाख रुपये कमविले आहेत. हा आकडा सर्वांसाठी चक्रावणारा आहे. गेल्या पाच वर्षातील कोथिंबीरीचा हा उच्चाकी दर असल्याचे कोथिंबीर चे व्यापारी काका शिवरकर, महेश जगताप आणि अभिजित जगताप सांगतात. मुरूम आणि वानेवाडी या गावात गेल्या महिन्याभरात २० एकरातून जवळपास ३० ते ३५ लाखांची उलाढाल झाली आहे तर वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी याठिकाणी अवघ्या ७ एकरातून तब्बल १५ लाखाची उलाढाल केली आहे.  वाणेवाडी (मळशी) या ठिकाणचे अविनाश जगताप यांच्या एक एकर कोथिंबीरीला तब्बल ४ लाख ५० हजार दर मिळाला आहे,  वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप यांच्या एक एकर कोथिंबीरीला तब्बल ३ लाख २१ हजार  दर मिळाला आहे, हा दर गेल्या पाच वर्षातील सर्वोच्च दर ठरला आहे. तर त्या खालोखाल परवा मळशी येथीलच सुनील काकडे यांच्या कोथिंबीरीला २ लाख ७५ हजार हा तीन नंबर दर ठरला आहे. 
          कोथिंबीर हे पीक अवघ्या एक महिन्याचे असते. एक एकर कोथिंबीरीला ४० हजारांच्या आसपास खर्च येतो. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तरकारी पिकाला दर नव्हते आता कोथिंबीरीच्या दरामुळे शेतकऱ्यांच्यात समाधान आहे.
To Top