संत सोपानकाका पालखी सोहळा : जुन्या आठवणींना उजाळा

Pune Reporter
संत सोपानकाका पालखी सोहळा : जुन्या आठवणींना उजाळा 


-सोमेश्वरनगर येथे आज पार पडले असते सोपानकाका पालखी सोहळ्याचे गोल रिंगण


सोमेश्वरनगर    प्रतिनिधी

संत सोपानकाका महाराजांचे अश्वरिंगण आज बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले असते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी वारी रद्द केल्यामुळे भाविकांना हे रिंगण पाहता आले नाही.
            काल निरा ता पुरंदर  या ठिकाणी निरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज्यांच्या प्रतिकात्मक पादुकांना स्नान घालण्यात आले तर आजच्याच दिवशी संत सोपानकाका महाराजांची पालखी निंबुत येथील मुक्काम संपवून सोमेश्वरनगर या ठिकाणी मुक्कामी येत असते, तत्पुर्वी काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोहळ्याचे अश्वरिंगण पार पडत असते मात्र सोहळाच रद्द झाल्याने हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या अश्वरिंगण आज सोमेश्वरनगरकर मुकले आहेत.आज काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण पाहण्यासाठी हजारो च्या संख्येने भाविक गर्दी करत असतात मात्र आज याठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळाला.

    गेल्यावर्षीच्या  संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिलेअश्व रिंगणातील  काही निवडक फोटो -

To Top