डॉक्टरांचा निष्काळजीपणा नुकतेच जन्मलेल्या बाळाचे निधन- निरा येथील प्रकार
पुरंदर : प्रतिनिधी
नीरा येथील प्रसिद्ध रुग्णालयात एक नुकत्याच जन्मालेल्या बाळाचे निधन झाले. गर्भवती महिलेची दिवस भरले नव्हते त्यांचे सिझेरीएन पद्धतीने प्रसुती केली. बाळाच्या जन्मा नंतर काही वेळाने ते अस्वस्थ झाले व काही वेळाने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धुडगूस घालून तोडफोड केली.
पुरंदर तालुक्यातील सासर असलेली महिला बाळंतपणासाठी बारामती तालुक्यात आली होती. तीने नीरेतील प्रसिद्ध रुग्णालयात पुढील उपचारासाठी नाव नोंदणी करुन तपासणी करून घेतली होती. काल गुरुवारी सोनोग्राफी करून घेतली तेंव्हा बाळंतीणीच्या पोटातील पाणी कमी झाल्याचे सांगण्यात आले. उद्या शुक्रवारी सिझेरीएन पद्धतीने बाळंतपण करण्याचा सलू रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे गरोदर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी तील बाळंतपणासाठी नीरेच्या प्रसिद्ध रुग्णालयात दाखल केले. दुपारी चारच्या सुमारास बाहेरील एक डॉक्टर आले व त्यांनी सिझेरीएन पद्धतीने बाळंतपण केले. पण काही वेळाने बाळाला अस्वस्थ वाटल्याने बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करून आले. त्यांनी बाळाची प्रथमीक तपासणी केली व त्यांच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला बाळाला रुग्णालयात दाखल करण्या पुर्वीच ते मृत झाले होते.
या घटनेनंतर नातवाईकांचा तोल ढासळला ते भाऊक झाले. नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी हवदोस घातला रिस्पशन टेबल ढकलून दिला. त्यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी व महिला डॉक्टरांनी नातेवाईकांना शांत करण्याचे प्रयत्न केले. पण नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांची रुग्णालयातील कर्मचाऱी व डॉक्टरांशी हुज्जत वाढली. महिला कर्मचारी व डॉक्टरशी असभ्य वर्तन करत बाचाबाची केली. त्यामुळे महिला डॉक्टरांनी नीरा पोलीस दुरक्षेत्रात फोन करून पोलीसांना बोलवले. पोलीस, राजकीय पुढारी व डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन नातेवाईकांची समजूत काढत प्रकरणाची कोणतीही तक्रार पोलीसांत न करण्याचे ठरले व नातेवाईकांना घरी पाठवण्यात आले.
अशा घटना नीरा परिसरातील रुग्णालयात सतत घडत असतात. काही रुग्णालयांच्या डॉक्टरांना बाळंतपणाची रितसर परवानगी नसताना ही अशा धोकेदायक पद्धतीने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातं आहे. बाळांतीनीचे सिझेरीएन करते वेळी ज्या दक्षता घेणे गरजेचे असते त्या सुविधांचा अभाव येथे असतो. सिझेरीएन वेळी मुलं तज्ञ, बालरोगतज्ज्ञ, उपस्थित असणे गरजेचे असते पण सरसकट हे खर्चीक असल्याने टाळले जाते. याचा परिणाम अशा घटना घडतात अशी चर्चा नीरा शहरात दबक्या आवाजात संध्याकाळी केली जाते आहे.