दिलासादायक.... पुरंदरच्या मांढर गावाचे १८ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यातील मांढर गावातील एका वृद्धाचा मृत्यु झाला होता. त्यांना कोरोना झाल्याचे दोन दिवसांनी समजले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील १९ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. काल त्यांच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर आज इतर १८ जनांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पुरंदरच्या प्रशासनाने सुस्कार सोडला आहे.
मांढर मधील रुग्णाच्या संपर्कातील १८ लोकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या प्रशासनाने दिली आहे. मांढरच्या मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यावर पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. हा रुग्ण देवीचा सेवेकरी असल्याने कितेक लोकांच्या संपर्कात ते आल्याची भिती व्यक्त केली जात होती. पण पुरंदर तालुक्यातील प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ज्या व्यक्तींनी हाताळला किंवा जे लोक संपर्कात आले त्यांची योग्य पद्धतीने माहिती घेत त्यांच्यावर योग्य उपचार घेतले. त्यांना विलगिकरण कक्षात ठेवून कोरोनाचा प्रसार रोखला. या १९ लोकांचे कोरोना चाचणी घेण्यात आली तर यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी ती व्यक्ती उपचाराला साथ देत असून लवकरच ते कोरोनावर मात करून येतील असा विश्वास प्रशासनाने व्यक केला आहे.
काल शनिवार पर्यंत पुरंदर तालुक्यात एकुण पॉझिटिव्ह रुग्ण ८, कोरोनामुक्त झालेले १, कोरोनामुळे मृत्यू १, कोरोनाचे उपचार घेत असलेले ६